Press "Enter" to skip to content

घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत जिल्हास्तरिय सेल्फी विथ तिरंगा उपक्रम

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाने जल्लोषाने सर्वत्र साजरा होत आहे. ह्या निमित्त शासनाच्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत नेहरू युवा केंद्र अलिबाग- रायगड, त्याचप्रमाणे महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या सहआयोजनातून रायगड जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरिकांना सेल्फी विथ तिरंगा ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या घरी जो तिरंगा साकारला असेल त्या ध्वजा सोबतची एक सेल्फी घेवून आपले पुर्ण नाव व पत्ता ९८७०९५५५०५ ह्या व्हाटसअप क्रमांकावर पाठवून सन्मानपत्र प्राप्त करावे असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे तिरंगा ध्वज हा कागदाचा किंवा प्लास्टिक चा नसावा. तिरंग्यासोबत सेल्फी घेताना तिरंग्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. या अभियानात सहभागी नागरिकांना १८ ऑगस्ट पर्यंत सन्मानपत्र दिले जातील याबाबतची नियमावलीची माहिती पत्रिका जाहिर केली आहे. तरी समस्त रायगडकरांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या तिरंगा ध्वजाला घरोघरी लावुन त्या सोबतची एक सेल्फी घेवून आमच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद द्यावे असे मत महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.