Press "Enter" to skip to content

घराला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान

पनवेलच्या विश्राळी नाका येथील जसधनवाला कॉम्प्लेक्स मधील घराला आग

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्स मधील एका घराला आज सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे .              

येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी तातडीने बाहेर धाव घेतली तसेच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करण्यात आले .

जवानांनी शर्तीचे प्रयंत्न करून साधारण एक तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले . या लागलेल्या आगी मध्ये घरातील सर्व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे . सदर आग ही शॉटसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामक विभागाचे  प्रमुख अनिल जाधव यांनी वर्तविला आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.