लाइफलाईन हॅस्पिटलमधील डायरेक्टर डॉक्टर जानवी पाटील यांची हिंमतीमुळे वाचला वाहतूक पोलिसाचा जीव
सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
पनवेलमधील लाइफलाईन हॅस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर जानवी पाटील यांच्या सतर्कतेमुळे आज वाहतूक पोलिसाचा जीव वाचला आहे.
डॉ.जानवी पाटील या खारघर कोपरा ब्रिज येथून आपल्या वाहनातून जात असताना एम एच ४६ बी झेड ६२९६ क्रमांकाची कार एका वाहतूक शाखेच्या पोलिस पोलीस कॉन्स्टेबल नामदेव गादेकर यांना बोनेटवर विरुद्ध दिशेने फरपटत नेत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर गाडीचा पाठलाग करून त्या वाहनाला कोपरा ब्रिज पासून स्वर्णागंगा ज्वेलरी शॉप खारघर म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर गाडीच्या बोनेटवर ट्राफिक पोलीस ला फरपटत नेत असताना स्वतःची गाडी त्या फरपटत घेऊन जाणाऱ्या गाडीच्या पुढे त्यांनी आपली आदी नेऊन त्या कारचालकाची गाडी थांबवली.
यावेळी पाठीमागून धावत येणारे पोलीस नाईक निवृत्ती भोईर यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याला खारघर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तसेच पोलीस स्टेशन मधील स्टाफ ने डॉ.जानवी पाटील यांचे कौतुक करून मानवता दृष्टिकोन ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत.
Be First to Comment