आयकर विभाग, पनवेल च्या पुढाकाराने “आझादी का अमृत महोत्सव”
सिटी बेल ∆ पनवेल ∆
आयकर विभाग, पनवेल जि. रायगड या ठिकाणी भारत सरकारच्या पुढाकाराने “आझादी का अमृत महोत्सव” स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून सायक्लोथॉन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आयकर विभागातील सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी तसेच सनदी लेखापाल आणि रायगड विभागातील कर सल्लागार सहभागी झाले होते.
श्री. अभिषेक सिंग, अतिरीक्त आयकर आयुक्त, पनवेल परिक्षेत्र यांनी कार्यक्रमाची सुरवात केली .
सकाळी 7.15 वाजता आयकर कार्यालय, पनवेल येथून या कार्यक्रमाची सुरुवात होऊन खांदेश्वर स्टेशन, मानसरोवर स्टेशन, कामोठे परिसरातील पुरातन गणेश मंदिर, ऐश्वर्या हॉटेल, अक्षय टॉवर आणि परत आयकर कार्यालय, पनवेल असे मार्गक्रमण केले .. सायक्लोथॉन चे 10.00 किमी अंतर होते.
सर्व सहभागींना प्रमाणपत्रे आणि अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Be First to Comment