Press "Enter" to skip to content

रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदानाबद्दल

लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने हृद्य सत्कार

सिटी बेल • सातारा • हरेश साठे •

ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही त्यामुळे ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले, त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबरची संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर या संस्थेच्या कार्याला मदतीचा हात खुल्ला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज (दि.०९) सातारा येथे केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६३ वा पुण्यतिथी कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दानशूर व्यक्तींचा सन्मान, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर संस्थेतील उत्कृष्ट शाखांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी खासदार शरद पवार बोलत होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करताना खासदार शरद पवार

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विठ्ठल शिवणकर, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार आशुतोष काळे, आमदार शशिकांत शिंदे, संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, तसेच जनरल बॉडी सदस्य अरूणशेठ भगत, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, पी.जे.पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, पदाधिकारी आणि रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सत्कार करताना खासदार शरद पवार

रयत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमी हाकेला साद देऊन संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव योगदान देत असतात. कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेेेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीर भूमीत समारंभपुर्वक हृद्य सत्कार करण्यात आला.

रयत शिक्षण संस्था मातृसंस्था माणून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला यावर्षी ०१ कोटी ९५ लाख रुपयांची देणगी, शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी ०१ कोटी ३० लाख रुपये, तर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ५९ लाख ९० हजार रुपयांची भरघोस देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, पुस्तक, श्रीफळ, रयत वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शकुंतला ठाकूर यांचा सन्मान आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्विकारला.

यावेळी पुढे बोलताना खासदार शरद पवार यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे काम हाती घेतले आणि आपले सर्वस्व त्यांनी झोकून दिले. अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात झाले आणि त्याला खत देण्याचे काम समाजातून झाले असून अण्णांचे स्वप्न असलेले रयत शिक्षण शिक्षण संस्थेचे विद्यापीठ लवकर साकारणार आहे, असेही खासदार शरद पवार यांनी यावेळी नमूद केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.