Press "Enter" to skip to content

वाहतूकदारांच्या समस्या दूर करण्यासाठी दिले निवेदन

प्रभूदास भोईर (अण्णा) यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

सिटी बेल • मुंबई •

प्रभूदास भोईर (अण्णा) यांनी मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतदादा पाटील, आमदार रोहितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी प्रभुदास भोईर यांनी विविध विषयांवरती मान्यवरांशी चर्चा केली. प्रभुदास भोईर हे शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत. वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी यावेळी प्रभुदास भोईर यांनी उपमुख्यमंत्री तसेच जयंत पाटील आणि रोहित पवार यांना अवगत केले.

प्रभुदास भोईर यांचे वास्तव्य असलेल्या कळंबोली परिसरात जागतिक दर्जाचे पोलाद मार्केट आहे. तसेच बाजूला नावडे तळोजा औद्योगिक वसाहत आहे. या दोन ठिकाणी येणाऱ्या हजारो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न ही तूर्तास गंभीर समस्या बनली आहे. याबाबत देखील प्रभुदास भोईर यांनी तिन्ही मान्यवरांना अवागत केले. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या ट्रक चालक आणि क्लिनर त्यांना भेडसावत असणाऱ्या समस्या देखील यावेळी प्रभुदास भोईर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या.

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शेड्युल अत्यंत व्यस्त असते. तरीदेखील त्यांनी आमच्या समस्या मागण्या अत्यंत शांतपणे ऐकून घेतल्या, तसेच नजीकच्या काळात संबंधित विभागांशी संलग्न अशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
– प्रभूदास भोईर (अण्णा).
अध्यक्ष,वाहतूक सेल, महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार पक्ष.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.