Press "Enter" to skip to content

कॅन्सरवर होणार आता पनवेलमध्ये उपचार

कॅन्सरवर अद्ययावत उपचार करणाऱ्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेल मधील शाखेचे रविवारी उद्घाटन

सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •

कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत उपचार करणाऱ्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेल मधील शाखेचे उद्घाटन रविवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ११ होणार असल्याची माहिती सेंटरचे डॉ.देवेंद्र पाल आणि डॉ.प्रितम कळसकर यांनी आज खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यातील खांदा कॉलनी मध्ये असलेल्या या सेंटरच्या उदघाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिध्द अभिनेत्री सामाजिक उद्योजिका आणि निर्माती डॉ. निशिगंधा वाड तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल (ACTREC) नवी मुंबईचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांची उपस्थिती असणार आहे.

मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ही कर्करोगांवर अद्ययावत उपचार करणारी डे-केअर साखळीस्वरुप संस्था आहे. मुंबई व महाराष्ट्रात ८ सेंटर्स सध्या कार्यरत असून गेली ४ वर्ष कर्करोगग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांमार्फत, सर्व आधूनिक सुविधांनी सज्ज अशा डे केअर सेंटर्समधे, वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई ऑन्कोकेअर येथे सध्या १५ उच्चशिक्षित मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट, ३० केमोथेरपी प्रशिक्षित परिचारीका व जवळपास २०० इतका प्रशासकिय कर्मचारी वर्ग असून, ८ डे केअर सेंटर्स रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. गेल्या ४ वर्षाच्या कालावधीत मुंबई ऑन्कोकेअरने दरवर्षी १५,००० केमोथेरपी या हिशोबाने ६०,००० हून अधिक केमोथेरपी दिलेल्या आहेत. एकंदर १,००,००० पेक्षा अधिक रुग्णांना समाधानकारक समुपदेशन व उपचार दिलेले आहेत. रुग्णांच्या समीप, उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उच्चश्रेणी व सुरक्षित पायाभूत सुविधांसह, वाजवी दरात उपचार उपलब्ध करून देण्याची खात्री डॉ.पाल व डॉ.कळसकर यांनी मुंबई ऑन्कोकेअरच्या वतीने दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.