रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई शाळेत शाळा पूर्व तयारी अभियान
सिटी बेल • उरण – मोठीजुई • उरण •
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई येथे शाळा पूर्व तयारी अभियानातंर्गत बाळ मेळाव्याचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले .
या कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरी काढून करण्यात आली.ढोल ताशा व लेझिम विविध घोषणा देत विविध वेशभूषा करून विद्यार्थी, पालक, शिक्षक,शा. व्यव. समिती सदस्य, अंगणवाडी ताई, मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

सर्व मान्यवर व पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे ही गुलाबपुष्प, चॉकलेट व मुलांना बर्थडे कॅप देऊन त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
इयत्ता १ली च्या दाखलपत्र विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक,भाषिक व गणितीय क्षमतांचा विकास करणे हे या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे व कार्यक्रमाविषयी माहिती प्रथम संस्था श्रीम.रणिता ठाकूर मॅडम यांनी आपले प्रास्ताविक केले.

तसेच हा कार्यक्रम राज्यात सर्वत्र सुरू असून विविध क्षमता विकास व अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी उत्तम आयोजन करून आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी व पालक उत्साह पाहून खूपच समाधान वाटते.नक्कीच या मेळाव्याचा फायदा मुलांना होईल असे मत मा. श्री गुरुनाथ ठोंबरे सर पं स. उरण साधनव्यक्ती यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक मा. सौ. ललिता ताई पाटील सरपंच ग्रुप ग्राम. मोठीजुई यांनी या मेळाव्याबद्दल व आदर्श शाळेविषयी बोलताना ही शाळा आपल्या गावचे वैभव आहे ते टिकवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल व भावी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व तदनंतर सर्व सात टेबलवरील कृतीविषयी माहिती घेतली.

बाळमेळाव्याच्या माध्यमातून मुलांसोबत आई वडील देखील आपल्या मुलातील आकलन क्षमता, बौद्धिक क्षमता ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील असे मत बऱ्याच माता-पालकांनी व्यक्त केले.आणि या शैक्षणिक उपक्रमाचे पालकांसह सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

यावेळी सौ.ललिता ताई पाटील सरपंच मोठीजुई श्री.पुरुषोत्तम भोईर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. तृप्ती ताई बंडा उपाध्यक्षा, श्री.मुकेश महाजन व श्री गुरुनाथ ठोंबरे विषय साधन व्यक्ती पं स उरण शिक्षण विभाग श्रीम.रणिता ठाकूर मॅडम व सौ सुनिता पाटील मॅडम प्रथम संस्था, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,सौ.हेमंती भगत सौ. जयवंती पाटील व श्रीम. भाविका कामोठकर अंगणवाडी सेविका मोठी जुई,सौ.करिष्मा पाटील अध्यक्षा गोवलदेव महिला बचत गट व सदस्य पालक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमात उत्फुर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदर्श शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष म्हात्रे सर,सौ. रंजना म्हात्रे मॅडम,उपक्रमशिल शिक्षक श्री.संजय होळकर सर,श्री.दर्शन पाटील सर,श्री.संदीप गावंड सर,सौ.शर्मिला पाटील मॅडम,श्री.यतीन म्हात्रे सर व श्रीम ज्योती बामणकर मॅडम सर्व शा. व्यव. समिती सदस्य,गोवलदेव महिला बचत गट यांनी मेहनत घेतली.

सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री संजय होळकर सर यांनी करून मेळाव्याची सांगता करण्यात आली.












Be First to Comment