Press "Enter" to skip to content

वाढदिवसाचे अनोखं सेलीब्रेशन

धनाजीशेठ ठाकूर यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर ला दिली ५ लाखांची देणगी

सिटी बेल • उरण •

धुतूम गावचे दानशुर व्यक्तीमत्व असणारे माजी सरपंच धनाजीशेठ ठाकूर यांनी वाढदिवस कसा साजरा करावा याचा समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, महाराष्ट्र राज्य फ्लॅग डे फंडास रुपये ५,००,०००/- (पाच लाख) इतकी मोठी मदत दिली आहे.

धनाजी ठाकूर यांनी जिल्हा सैनिक वेल्फेअर ऑफिसर गोविंदराव साळुंखे यांच्या कडे हा ५ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी वेल्फेअर ऑर्गनायझर लालचंद कुंभार, कर्मचारी लक्ष्मण पाटील, दयाराम घासे उपस्थित होते.

धनाजीशेठ ठाकूर या दानशूर व्यक्तीमत्वास सिटी बेल मिडीया हाऊस तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.