Press "Enter" to skip to content

सिडकोच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश

प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी सिडकोला १० दिवसांची मुदत देऊन इज्जत वाचविण्याची दिली संधी !

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

सिडको प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या वतीने कायदेतज्ञ अ‍ॅड.डि.के.पाटील आणि त्यांचे सुपुत्र अ‌ॅड.कौस्तुभ डी.पाटील हे पितापुत्र शेतक-यांच्या समवेत सिडको कार्यालयात अलिबाग येथील २ रे सह दिवाणी न्यायाधीस व स्तर यांच्या न्यायालयातील बेलीफ सिडकोच्या कार्यालयातील मालमत्तेच्या जप्तीच आदेश घेऊन आले.

या बातमीची सिडकोच्या अधिका-यांना कुणकुण लागली असावी म्हणून की काय सिडको भवनाच्या प्रवेश द्वाराजवळ सिडकोच्या अंगरक्षकांनी सिडको भवनात शेतक-यांना जाण्यास मज्जाव केला. हे पाहून कायदेतज्ञ अ‌ॅड.डि.के.पाटील पिता-पुत्रांनी तसेच न्यायालयाचे बेलीफ यांनी कायदेशीर बडगा उगालून तडक जाॅंईड एम.डी. एस.एस.पाटील यांच्या दालनात शेतक-यांन समवेत जावून जप्तीची कार्यवाही करण्याचे न्यायालयाचे आदेश सदर एस.एस.पाटील यांना दाखविले.

त्यानंतर पुढील जप्तीची कार्यवाही करण्यास सुरुवात करणार इतक्यात सदर जाॅंईड एम.डी.एस.एस.पाटील हे प्रकल्पग्रस्त शेतक-यां समवेत अ‌ॅड.डी.के.पाटील पिता-पुत्रां समोर गयावया करून जप्ती करू नये अशी विनवणी करून १० दिवसाची मुद्दत मागू लागले.

यावेळी मात्र सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी मनाचा दिलदारपणा दाखवून सिडको कडून लेखी हमीपत्र घेऊन १० दिवसाची मुदत देऊन सिडकोला आपली इज्जत वाचविण्याची संधी दिली.

येथील सिडको प्रकल्पग्रस्त शेतक-यांचा सिडको कडून येणारा मोबदला

१) श्री.काशिनाथ गोपीनाथ भोईर वगैरे१)१,१३,३९,८४८/-

२)श्री.तुकाराम दुकळ्या वगैरे-१,६५,९९,५८७/-


३)श्री.नामदेव सदानंद भोईर १,३३,९६,८६४/-

४)श्री.काशिनाथ गोपीनाथ भोईर वगैरे- ८८,४७,८८१/-

५)श्री.वसंत काशिनाथ पाटील-८५७६६७१/-

६)श्री.बाळाराम नारायण पाटील वगैरे- ५,५९,२९,७७६/-

७) श्री.अमित मोहन घरत- १,८५,९९,२८२/-

८) चंद्राबाई रामकृष्ण घरत- ७४,१३,०५९/-

९)श्री.लिलाधर वामन भोईर-१,०१,४२,८५४/-

१०) लिलाबाई मधुकर पाटील- ७,७०,४३,५३३

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.