पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस विभाग व रक्त साठवणूक केंद्र सुरू : पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
सिटी बेल | पनवेल |
महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे डायलिसीस विभाग व रक्त साठवणूक केंद्र सुरू झाले असून याठिकाणी गरजु रूग्णांना मोफत सेवा मिळणार आहे. या विभागाचे उद्घाटन आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी डॉ.सुहास माने – जिल्हा शिल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय,रायगड डॉ. सचिन संकपाळ – वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय पनवेल, पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष आर सी घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहकर, सारीका भगत, माधुरी गोसावी,शशीकला सिंह आदी उपस्थित होते.
Be First to Comment