Press "Enter" to skip to content

उरण बोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

उरण नगरीचे शिल्पकार नगराजशेठ काळाच्या पडद्याआड

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण नगरीचे शिल्पकार म्हणून ओळख असणारे माजी नगराध्यक्ष नगराजशेठ यांचे आज मध्यरात्रीच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वृत्त वाऱ्यासारखे पसरताच त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या नागरिकांची गर्दी झाली होती. शोकाकुल वातावरणात उरण बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

नगराजशेठ यांचा परिचय पुढील प्रमाणे

ओंकर अपार्टमेंट,विमला तलावाजवळील आपल्या निवासस्थानी वयाच्या 18 व्या वर्षी राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन गेल्या 8 निवडणुकांमध्ये सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येऊन आपल्या विक्रमाची नोंद केली आहे. सन 1957 ते 1980 च्या काळात उरण नगरीच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळताना भविष्यात उरण मध्ये होणाऱ्या औद्योगिक क्रांतीच्या संहिते बरोबरच उरण शहराचा विकासही आवश्यक असल्याची जाण या नेत्यांनी ठेऊन प्रशासन कुशल असणाऱ्या या मुसद्दी पुरुषाने उरण नगरी बरोबरच परिसराचा कायापालट करण्याचा संकल्प करून त्याची अमलबजावणी केली.म्हणूनच सामान्य जनतेचे प्रेम त्यांना लाभले.

आपल्या उज्ज्वल कारकिर्दीत विमला तलावच्या काठावर सुशोभीकरण करून नागरिकांना सायंकाळी काही वेळ निरोगी नैसर्गिक वातावरणात स्वच्छ मोकळ्या हवेत फिरण्याची संधीही उपलब्ध करून दिली. इतकेच काय तर संगीताच्या किमयेने माणसाच्या मनाची मरगळ झटकली जाते. यासठी विमला तलावात लाउडस्पीकर वरून उपस्थित जनतेला संगीताचा खजिनाही ऐकण्यासाठी उपलब्ध करून ठेवला होता.

बागेत आपल्या पालकां समवेत येणाऱ्या चीमुरड्यांची सोय करण्यासाठी हा राजकारणी विसरला नाही. यासठी सानेगुरुजी बालोद्द्यान सुरु करून त्याचाही विकास केला. हे करीत असताना भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसरही त्याला कधी पडला नाही, म्हणून उरणच्या बौद्धवाड्यात दलित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्द्यानाची निर्मितीही केली. इतकेच नाहीतर बौध्दवाड्यांतील दलित समाज्याच्या उत्कर्षासाठी समाजकल्याण मंदिर सभागृहही बनविण्यास ते कधीच विसरलेत नाही.

प्रत्येक मनुष्याचा अंतकाळहा ठरलेला असतो त्याल बंधन असते ते वेळेचे काळाचे,पृथ्वीवर मानव प्राणी हा हुशार म्हणून गणला जात असल्याने त्याच्या अंतसमयी तो चीरशांती घेताना निसर्गाने भरलेल्या जागेत ती त्याला मिळावी इतका उद्दात्तहेतू ठेऊन बोरीमधील स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगरपरिषदेमध्ये तयार करून तो अमलातही आणला. पाण्याशियाय जीवनहीव्यर्थ आहे. मग पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकणाऱ्या मोरागावांतील कोळी भगिनीचा प्रश्न सोडविण्या साठी मोरा गावात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली.

शिक्षण हि काळाची गरज हि या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्याने तेव्हाच जाणून घेतली गोर-गरिबांची मुले शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून उरणनगरपरिषदेमध्ये प्राथमिक शाळेची सोय तर केली त्याच बरोबर शाळेसाठी इमारत बांधण्याचा प्रस्ताव हि तयार करून तों अमलात आणला.त्यामुळे उरणांतील असंख्य गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रवेशव्दारे खुली झाली,इंग्रजी हि जागतिक मान्यताप्राप्त भाषा आहेमग उरणचा वाढता औद्योगिक विकास लक्षात घेऊन सामान्य माणसालाही आपल्या पाल्याला इग्रजी शिकता यावे असा विचार मनात येताच “उरण एज्युकेशन सोसायटी” स्थापना करून यु.इ.एसविद्यालय सुरु केले. सामान्य करिता इंग्रजी माध्यमाचा मार्ग खुला केला.

उरणांतील चर्च ट्रस्टच्या मालकीच्या जागेत असणाऱ्या शहराच्यामध्य भागी मच्छीमार्केट होते.हि अपुरीजागा लक्षात घेऊन नवीन मच्छीमार्केट बांधण्याचा प्रस्ताव तयार केला.उरणकोट नाका येथे उरण नगरपरिषदेच्या वतीने सुसज्ज असे मच्छीमार्केट व भाजी मार्केटसाठी विस्तारित इमारती बांधल्या.

नगरपालिकेच्या कार्यालयाचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला होता.यासठी सर्वोदय वाडीची सात एकर जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेमध्ये असनस्थ असतना केली त्यामुळे आज इतक्या मोठ्या जागेत नवी राजकर्त्यांना नगरपरिषदे साठी आधुनिकीकरणाने सुसज्ज इमारत उभारणे शक्य झाले आहे. बोरीस्मशानभूमी पासून उरण कोळीवाड्या पर्यंत रस्ता बांधून या दूरदर्शी माणसाने पुर्णकेला, पुढे भविष्यात उरण-मोरा रस्त्यावरील रहदारीचा विचार करून त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्तावही तयार करून ठेवला.

उरणातील जेष्ठ नागरिकांना आपली सुखदु:ख आपल्या मित्र परिवाराला एकत्र घेऊन गप्पागोष्टी करण्या साठी पेंशनरपार्कची व्यवस्था हि त्यांनी जेष्टांसाठी करून दिली. आजही या उरणच्या शिल्पकाराचे उरण शहर अत्याधुनिक विकासाने सुसज्ज व्हावे म्हणूनही काही संकल्पना आणली.

मध्यंतरीच्या काळात ते जरी राजकरणापासून अलिप्त राहिले असले तरी उरण तालुक्यातच नाहीतर अन्य ठिकाणी ज्याज्या गावात मंदिराचा जीर्णोधार झाला मंदिराला देणगी नाही असे झालेच नाही,म्हणूनच त्यांच्या एकसष्टीच्या संमारंभा साठी अर्जुन उपस्थिती दर्शविणारे जेष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले होते “इस्ट अँड वेस्ट नगराज शेठ इज द बेष्ट”

नगराज शेठ जीवनमुक्तस्वामीच्या मठीचे प्रमुख विश्वस्त म्हणून आज पर्यंत काम पहात होते. या ठीकाणी त्यांनी शेठ परिवाराकडून भोजनालय उभारून भाविकांची महाप्रसादाची सोय केली आहे.याठिकाणी असणारी अन्य समाधी मंदिरांचा आता ते नव्याने जीर्णोद्धार करणार होते. तशी योजनाही त्यांनी तयार केली होती. एक सुसज्ज हॉस्पिटल आणि एक डायलेसिस सेंटर व एक सीबीएसई स्कूल सुरु करण्याचा त्यांचा मांनस होता त्यापैकी ते नगराजशेठ इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल सुरु करू शकले काल मठीवरती सफला एकादशीच्या निमित्ताने भाविकांना शेवटचा फराळ देऊन अखंड समाज्यावर मनापासून प्रेम करणारा हा अभिषेक्त सम्राट आगरी-मारवाडी नेता आहे असे हक्काने सांगणारे आमचे नगराज शेठ जीवनमुक्तस्वामीच्या चरणी विलीन झाले.

नगराजशेठ यांच्या अचानक जाण्याने उरणवर शोककळा पसरली कारण अखंड समाजावर मनापासून प्रेम करणाऱ्या नेत्या बाबत इतकच म्हणावे लागेल “परोपकाराचिया राशी | उदंड घडती जयासी | तयाचिया गुणमहत्वाशी तुळणा कैंची असे समजले जाणारे नगरीचे शिल्पकार नगराजशेठ हे आज पुन्हा कधी न परतण्यासाठी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता उरल्या आहेत त्या फक्त नगराजशेठ यांच्या आठवणी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.