किशोरीताई पेडणेकर धमकी प्रकरणी भाजपा उरण कायदे विषयक सल्लागार उदय म्हात्रे यांची चौकशी
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांना जीवे मारण्याची व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे पत्र मिळताच महापौर पेडणेकर यांनी पोलिसात पत्र लिहिणाऱ्या व धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर आरोपीचा उरण पोलीस ठाण्या कडून कसून चौकशी सुरु आहे.
मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांना जीवे ठार मारण्याची व अश्लील भाषेत बदनामी करणारे पत्रावर म्हात्रे आडनाव, उरणचा पत्ता असून पनवेल पोस्टाचा शिक्का आहे. त्यामुळे उरण व पनवेल पोलीसांनी म्हात्रे आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली. या तपासात उदय केसरीनाथ म्हात्रे राहणार केगाव, उरण यांचीही चौकशी केली. उदय म्हात्रे हे एका नामांकित कंपनीत सिनियर एच आर मॅनेजर म्हणून काम करत आहेत. तसेच भाजपा उरण कामगार कायदे विषयक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली.
मात्र उदय म्हात्रे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, माननीय किशोरीताई पेडणेकर यांना ज्या व्यक्तीने पत्र लिहिले त्याची आम्ही निंदा करतो. माझे नाव यात मुद्दामून गोवले जात आहे. या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही.माझी बदनामी सुरु आहे. जो कोणी अपराधी आहे किंवा पत्र लिहिणारा आरोपी आहे तो आरोपी त्वरित पकडला जावा अशी माझी मागणी आहे. माझा कोणत्याही प्रकारे त्या पत्राशी संबंध नसताना पोलीस प्रशासनाकडून मला फोन सुरु आहे. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला आहे.मात्र त्या पत्राशी माझा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट मत भाजपचे उरणचे कायदेविषयक सल्लागार उदय केसरीनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.



















Be First to Comment