Press "Enter" to skip to content

वनरक्षक योगेश देशमुख यांनी केला माऊंट एव्हरेस्ट ट्रेक

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

रोहा वनविभागातील वनपरिक्षेत्र रोहा मधील वनपरिमंडळ मेढा, वनरक्षक मेढा या पदावर असणारे वनरक्षक श्री.योगेश सुरेश देशमुख यांनी माऊंट एव्हरेस्ट ट्रेक केला.

वनविभागात रुजू होण्या आधी योगेश देशमुख फोटोग्राफर म्हणून काम करत होते. फोटोग्राफी करता करता ट्रेकची आवड लागली. योगेश यांनी महाराष्ट्रातील कळसुबाई, हरीचंद्रगड,रायगड, शिवनेरी, सिंहगड, राजगड,अशेरीगड, आजोबापर्वत, गोरखगड,भैरवगड, अवचितगड इ. ट्रेक केले आहेत. श्री.योगेश सुरेश देशमुख ह्यांचे वडील वनविभागात कार्यरत होते त्यांच्या मृत्यू नंतर ते त्यांच्या जागी अनुकंप तत्वावर महाराष्ट्र वनविभागात दिनांक ०३/०३/२०२० रोजी रुजु झाले.आधीच ट्रेक ची आवड असलेले योगेश आपल्या नियतक्षेत्रातील जंगले फिरून घेत तसेच १५ऑगस्ट २६ जानेवारी दिवशी स्वतः सोबत एका जोडीदाराला घेवून रोहा येथील मौजे मेढा गावाला लागून असलेले  अवचित गडावर ध्वारोहणाचा कार्यक्रम पार पाडत.

माऊंट एव्हरेस्ट ला ट्रेक करणे हा स्वप्न त्याला रोज पडत आयुष्यात एकदा तरी मी एव्हरेस्ट ला जाणार असा ध्यास त्याच्या मनी होता.मग काय माऊंट एव्हरेस्ट ला जाण्याची संधी त्याला ऑक्टोबर २०२१ ला मिळाली. हा ट्रेक १३ दिवसांचा होता. स्वतः बँकेचे वैयक्तिक कर्ज घेतले तयारी सुरू झाली ट्रेक चे समान खरेदी केले आणि मर्द निघाला त्याचा स्वप्न पूर्ण करायला. कित्येक लोकांनी त्याला जाऊ नकोस तिथे काहीही होवू शकतो स्वप्नं पूर्ण करण्यापेक्षा जीव महतावाचा आहे असे सल्ले दिले परंतु योगेश याने मनाला गाठ मारून ठेवलेली मी जाणार तसा हा ट्रेक करत असतांना ८ दिवस चढायला लागले अन उतरायला ५ दिवस.  २ दिवस भारतातून नेपाल ला जाण्यास व दोन दिवस येण्यास लागले.

असा १५ दिवसांचा प्रवास पूर्ण करून जगातील सर्वाधिक ट्रेक म्हणून माऊंट एव्हरेस्ट ओळखले जाते त्याचा ट्रेक पूर्ण केला. ह्या ट्रेक मध्ये एव्हरेस्ट बेस  कॅम्प( उंची ५३६४मी) व काला पत्थर(५५५५मी) उंच सर करून तेथे वनविभागाचा ध्वज फडकावला व महाराष्ट्र वनविभागाचे नाव मोठे केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.