सर्वात कठीण वजीर सुळका सर करून बाबासाहेब पुरंदरे यांना हर्षितीने वाहिली श्रद्धांजली
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
उरणच्या 7 वर्षीय हर्षिती भोईर हिने ठाणे जिल्ह्यातला सर्वात कठीण मानला जाणारा वजीर सुळका सर केला आहे. शिव अभ्यासक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली म्हणून हर्षितीने हे साहस केले आहे. वडील कविराज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षितीने आजवर अनेक गड सर केले आहेत.

वयाच्या पाचव्यावर्षी हर्षितीने 12 तासात 5 गड सर करण्याचा विक्रम करून या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकोर्ड, एशिया बुक ऑफ रेकोर्ड आणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे. तर हिमाचलमधील फ्रेंडशीप पीक सर करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तिने 15 हजार 300 फुटांचा बर्फ़ातील ट्रेक करून, सर्वांची मने जिंकली होती. तर राज्यातील कठीण मानल्या जाणारे कालावंतीण गड, सैलबैला क्लाइम्ब, भैरवगड, गोरख गड हे देखील सर करून, सर्वांना चकित केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात कठीण समजला जाणारा वजीर सुळका सर करून तिने शिवशाहीर, शिवाभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. वजीर सुळका सर करणारी ती सर्वात लहान मुलगी ठरली आहे. तिच्या या साहसी विक्रमाला एसएल अडव्हेचर ग्रुप पुणे यांच्या लहू उघडे व त्यांचे सहकारी यांची उत्तम साथ मिळाली. तिच्या या साहासाबद्दल सर्व थरातून कौतुक केले जात आहे.




















Be First to Comment