Press "Enter" to skip to content

नवरात्रोत्सवात आरोग्याचा जागर

नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ-बोरी, येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ-बोरी, उरण डॉक्टर असोसिएशनचे व लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबीर व लाईफ लाईन हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे होणेश्वर मंदिर -बोरी, उरण येथे आयोजित करण्यात आले होते. जनतेचा या दोन्ही शिबिरांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरांच्या आयोजना बद्दल नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ, बोरी यांच्या वतीने अध्यक्ष अतुल ठाकूर यांनी उरण डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ प्रीती संतोष गाडे व पदाधिकारी तसेच लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर व पदाधिकारी व लाईन हॉस्पिटल पनवेल चे आभार मानले आहेत.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अतुल ठाकूर, प्रमुख कार्यकर्ते सुदेश साळुंखे, विशाल चौकेकर,कुणाल पवार, दिपेश म्हात्रे, वसंत कुळये, नंदकुमार पाटील,दिलीप साळुंखे, नंदन पानसरे, हर्षद समेळ,विनोद म्हात्रे,हेमंत सतेरे,रवी म्हात्रे, सचिन पालकर,विजय सतेरे, निलेश म्हात्रे,योगेश तांबेटकर,प्रतिक उभारे,रोहन गुरव,गितेश पवार, नितेश मालवणकर, सचिन उकारडे, निलेश ठाकूर, रजू हातलोणकर, नरेंद्र ठाकूर,संतोष पवार, तेजाब मसके,हेमंत अधिकारी, कमलाकर पवार, प्रशांत ठाकूर,परमानंद करंगुटकर तसेच महिला कार्यकर्त्या वंदना पवार, जयेशा सतेरे, सुमन जाधव, शुभदा सतेरे, मेघा जाधव, लता चव्हाण, शकुंतला ठाकूर व अरुणा थळी यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.