सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
केंद्र सरकारने लाखो युवाना बेरोजगार करणाऱ्याचे काम केले. “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” या निमित्ताने केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व तरुण व महिला कामगारांनी हा दिवस साजरा केला.
यापुढे कोणाचाही रोजगार जाऊ नये आणि कोणाचाही संसार रस्त्यावर येऊ नये यासाठी निषेध नोंदविण्यात आला. हा निषेध मोर्चा कामगार नेते, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत आणि अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक दत्तात्रेय गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चासाठी उपस्थित उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक लंकेश हिरामन ठाकुर, सरचिटनिस उरण तालुका इंटक प्रांजल दशरथ भोईर, सचिव उरण तालुक़ा युवक इंटक रविंद्र क. पाटील, उपाध्यक्ष उरण तालुका युवक अनिल ठाकुर, सरचिटनिस रायगड जिल्हा युवक इंटक अजित ठाकुर, उपाध्यक्ष मनसे उरण तालूका राकेश भोईर,संदीप वर्तक, संदेश भोईर, नितेश भोईर, समीर गावंड, सुंदर कोळी, हौशिराम भोईर, राकेश भोईर, अनंत पाटील, शशि भोईर, संतोष भोईर, रोहन ठाकुर, समीर ठाकुर, निलेश मोड़खरकर, सागर ठाकुर, जरेंद्र ठाकुर, मोहिनी ठाकुर, सुलोचना ठाकुर, दमयंती ठाकुर, दमयंती भोईर, देवकाबाई भोईर, रेवती परब, रेखा ठाकुर, पुष्पाबाई पाटील, अरुणा ठाकुर, आनंदी पाटील, सूनंदा पाटील व इतर कामगार उपस्थित होते.













Be First to Comment