Press "Enter" to skip to content

काॅंग्रेसतर्फे उरण शहरातील नागरिकांसाठी कोवीड चे विनामूल्य लसीकरण

सिटी बेल | उरण |

उरण शहर काँग्रेस कमिटी च्या विद्यमानाने व रायगड जिल्ह्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सहकार्याने आज उरण शहरातील नागरिकांसाठी कोवीड चे विनामूल्य लसीकरण करण्यात आले . आज एकुण 228 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महेंद्र घरत ह्यांच्या हस्ते या लसीकरण मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले. ह्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, उरण विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक अखलाख सिलोत्री, जिल्हा सरचिटणीस गणेश सेवक, सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत, निलेश मर्चंडे, अय्याज भाई फकी, एल टी लवे, सदानंद पाटील, गुफरान तुगेंकर, रवींद्र मढवी, सुरेश शेलार, उमेश भोईर, सौ.चंदा मेवाती , अमिना पटेल, सुनील काठे व पदाधिकारी यांनी विषेश परिश्रम घेतले व लसीकरण कॅम्प यशस्वी केले.

उरण शहर अध्यक्ष किरीट पाटील यांनी सर्वाचे आभार मानले . शहर अध्यक्षा अफशा मुकरी याचे चिरंजीव बिलाल व त्याच्या मुलीने अतिशय मोलाचं सहकार्य करत आलेल्या नागरिकाचे रजिस्ट्रेशन करण्याचे काम केले त्याचे विषेश आभार किरीट पाटील यांनी शहर कमीटी तर्फे मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.