Press "Enter" to skip to content

करंजा गावात साथीचे आजार ; पुन्हा कोरोनाचा फैलाव होण्याची ग्रामस्थांना भीती

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

करंजा गावात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणे ही राज्यातील, परराज्यातील व इतर गावातील खलाशी व व्यवसायासाठी आलेल्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना केली नाहीतर पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तशा प्रकारचा मेसेज व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल झाला आहे.

दररोज बदलत्या ऊन पाऊस हवामानामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला असा आजाराने अनेकांना ग्रासले आहे. करंजा गावातील सर्व दवाखान्यात उपचारासाठी गर्दी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

यामध्ये प्रामुख्याने मासेमारी होड्यांवर खलाशी व तांडेल हे स्थानिकांपेक्षा कमी पगारात मिळत असल्याने जिल्हाबाहेरील व परराज्यातील व तसेच इतर व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यांची कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नाही. त्यामुळे या साथीच्या आजाराचा फैलाव झाला असल्याचे बोलले जाते. तसेच गावात सोशल डिस्टंट न पाळणे व मास्कचा वापर न करणे असे चित्र नाक्यांनाक्यावर पहावयास मिळते.

त्यामुळे ही भविष्य काळातील धोक्याची घंटा आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन ठोस उपाययोजना केली नाहीतर पुन्हा एकदा कोरोनाच्या येणाऱ्या ३ ऱ्या लाटेचा फटका बसत पुन्हा एकदा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन गाव सील करण्याची वेळ येण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावर प्रशासन काय उपाययोजना करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.