Press "Enter" to skip to content

आयओटीएल कंपनीने गावांना दिली कोविडशी मुकाबला करण्याची शक्ती

रायगड जिल्ह्यातील चार गावांत १२६३ लसीकरणे, बोकडविरा कोव्हिड सेंटरला दिल्या ४०० लिटर ऑक्सिजनच्या टाक्या

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

कोव्हिड साथीचा मुकाबला करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील चार गावांत १२६३ लसीकरणे, व बोकडविरा कोव्हिड सेंटरला ४०० लिटर ऑक्सिजनच्या टाक्या पुरवत इंडियन ऑइलटँकिंगने जिल्ह्याशी असलेली बांधिलकी दाखवली आहे.

१५ लिटर ऑक्सिजनची गरज असलेल्या २६ रुग्णांना पुरेल अशी सोय यामुळे बोकडविरा येथील केंद्रात झाली आहे. तसेच यापूर्वीच्या आठवड्यात कंपनीने नजिकच्या चार गावांत लसीकरण शिबीरे राबवून १२६५ नागरिकांना पहिली लस पुरवत उरण तालुक्यातील गावपाड्यांत लसीकरण सुलभ केले, तसेच जिल्हा प्रशासनाच्या लसीकरण नियोजनात हातभार लावला. तसेच आज चिर्ले ग्रामपंचायतीस कंपनीने कचरा संकलन वाहन अर्पण केले, या सोहळ्यास आमदार महेश बालदी हे देखील हजर होते.

इंडियन ऑइलटँकिंगची ही ‘शेजारधर्म मोहीम’ उरणमधील धुतूम, रांजणपाडा, जसखार व चिर्ले या चार गावांत राबवण्यात आली. इंडियन ऑइलटँकिंगचे व्हाइस प्रेसिडेंट अतुल खराटे या प्रसंगी म्हणाले, _“अत्यंत महत्वाच्या जेएनपीटी मार्गावर आमचा हा पेट्रोलियम टर्मिनल असून कोव्हिडच्या पहिल्या लाटेतही आम्ही येथील वस्त्यांच्या मदतीस आलो आहोत. गेल्यावर्षी सुमारे ६०० कुटुंबांना शिधा, मास्क व सॅनिटायझरचे वाटप कंपनीने केले असून, या वर्षी संसर्गाविरुद्ध अजून भरीव मदतीची गरज होती, म्हणून या लसीकरण शिविरांची कल्पना सुचली.”_ असे खराटे म्हणाले.

अपोलो रुग्णालयांच्या विद्यमाने भरवलेल्या या शिबीरांचे लाभार्थी आसपासचे रोजंदार व असंघटित कामगार असतील. कंपनीचे मनुष्यबळ प्रमुख नवीन चंद्रा म्हणाले, _“रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या कुटुंबात संसर्ग झाल्यास आख्ख्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. या लसीकरणातून निदान एक तरी लस लाभल्याने तालुक्यात तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यात आम्ही हातभार लावल्याचे समाधान आहे. दुसऱ्या लसीकरणाचे वेळापत्रक आखून या लाभार्थींचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल”

कोव्हिड काळात इंडियन ऑइलटँकिंगने रायगड जिल्ह्यात सुमारे अनेक विकासकामे केली असून यात जिल्हा प्रशासनास कोव्हिड लढ्यात आर्थिक मदत, उरण तालुक्यातील गावांसाठी शिधा व रुग्णवाहिका साहाय्य व धुतूम गावासाठी घनकचरा प्रकल्प, चिर्ले गावासाठी कचरागाडी यांचा समावेश आहे.

भारतातील अग्रगण्य तेलकंपनी इंडियन ऑइल व जर्मनीतील ऑइलटँकिंग या दोन कंपन्यांचा संयुक्त विद्यम म्हणजेच इंडियन ऑइलटॅंकिंग भारतात गेली २३ वर्षे विविध तेलकंपन्यांना साठवणसेवा पुरवत आहे. १९९८ साली उरणमधील पहिले पेट्रोलियम टर्मिनल टाकल्यानंतर पुढील २२ वर्षांत कंपनीने देशात सहा टर्मिनल्सद्वारे पेट्रोलियमचे स्वतंत्र साठे तसेच ग्राहकांसाठी संचालन व देखरेखसेवा पुरवल्या आहेत. याशिवाय रोज सुमारे १४ टन बायोगॅस निर्मितीद्वारे हरित इंधनक्षेत्रातही कंपनीचे कार्य आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.