योगिनी पाटील खेलो इंडिया साठी ठरली पात्र : फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
सुधागड हायस्कूल कळंबोली ची विद्यार्थिनी : शाळेकडून सन्मान
सिटी बेल | कळंबोली | मनोज पाटील |
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी योगिनी पाटील ह्या विद्यार्थ्यीनीने राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत रोप्य पदक मिळविले त्या बद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या हस्ते योगिनी पाटील हिचा नुकताच सन्मान केला.
२५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बी एफ आय
राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी योगिनी पाटील हिने ५२ किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते .सदर स्पर्धेत तिने तिच्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. अंतिम सामन्यात ती हरियाणाकडून अटीतटीच्या खेळात काही गुणांवर पराभूत झाली त्यामुळे तिचे थोडक्यात सुवर्ण पदक हुकले या तिच्या यशस्वी कामगिरी मुळे योगिनी पाटील हि बाॅक्सर खेळाडू विद्यार्थीनी खेलो इंडिया साठी पात्र ठरली असून फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी ती सदर गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या तिच्या उज्ज्वल कामगिरी बद्दल सुधागड विद्या संकुल कळंबोलीचे प्राचार्य राजेंद्र पालवे ,उप मुख्याध्यापिका सरोज पाटील , कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे,पर्यवेक्षक वैजनाथ भद्रशेट्ये ,तिचे क्रीडा शिक्षक विलास पाटील ,विकास नाईक,वर्ग शिक्षिका सुनंदा भोसले ,नजिर शेख ,सुरेश शिंदे ,सिमा पाटील ,बिना पाटील ,सय्यद शेख ,अनिता पाटील ,माजी विद्यार्थी अजय सुर्यवंशी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.या वेळी तिचे पालक केतन महाले व मोनिका महाले व कोच अद्वैत शेंभवणेकर यांचे सुद्धा प्राचार्य राजेद्र पालवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .योगिनी पाटील हिने मिळविलेल्या यशाबद्दल सुधागड विद्या संकुलात चैतन्य निर्माण झाले असून सर्वांनी योगिनीचे कौतुक करुन अभिनंदन केले.













Be First to Comment