Press "Enter" to skip to content

कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी उपस्थित केले प्रश्न

कोरोना प्रतिबंध लस पहिला ते दुसरा डोस मधील अंतरा बाबत नागरिक संभ्रमात

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कोरोना प्रतिबंध लस पहिला ते दुसरा डोस मधील अंतरा बाबत नागरिक संभ्रमात आहेत, शासनाचे आरोग्य विभाग वेळोवेळी पहिल्या ते दुसऱ्या डोस मधील अंतरात बदल करत आहेत. याबाबत कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नागरिक पहिला डोस घेतल्या नंतर लसीकरण केंद्रावर दुसरा डोस 1 महिन्यानंतर घ्यायचा असे सांगण्यात आले, सोशल मिडिया वर दिल्लीच्या हेम्स हॉस्पिटल च्या नावाचा तक्का फिरत आहे, त्यामध्ये कोवल्डशीड आणि कोव्हक्सीन चा पहिला डोस घेतल्या नंतर दुसऱ्या डोस कालावधी कसा आहे हे दर्शविले आहे. आता शासन कोव्हीडशील्ड लस च्या दुसऱ्या डोस मधील अंतर सारखे बदलत आहे त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत.
आता कोव्हीडशील्ड डोस मध्ये पहिला डोस ते दुसऱ्या डोस मधील अंतरात 84 दिवसाचा कालावधी वाढवला आहे, याबाबत सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी 45 ते 84 मधल्या दिवसात काय करणार ?

कोविशील्ड वॅक्सिनचा पहिला आणि दुसऱ्या डोसचा प्रवास सुरुवातीला अठ्ठावीस दिवसाचा होता म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी घ्यायचा होता, त्यानंतर मुदत वाढ होऊन हा प्रवास 45 दिवसांवरून ते 60 दिवसांचा झाला. आता तो 84 दिवसांनी घेण्याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे.

त्यामुळे 13 मे 2021 रोजी ज्यांना पहिला डोस घेऊन पंचेचाळीस दिवस झाले होते त्यांनी दुसरा डोस घेतला. परंतु अचानक 2 डोसमधील कालावधीत मुदतवाढ झाल्याने उर्वरित सर्व लोकांना दुसऱ्या डोस करिता किमान 40 दिवस थांबावे लागणार आहे. यामुळे अजून 40 दिवस कोविशील्डचा दुसरा डोस कोणाला घेता येणार नाही. त्यामुळे 14 मे पासून प्रत्येक दिवशी जस जसे 45 दिवस होणार होते त्यांना आता मात्र दि. 21 जून पासून पुढे प्रत्येक दिवशी ज्यांना 84 दिवस होतील त्यांना त्या त्या दिवशी दुसरा डोस दिला जाईल तसेच 14 मे रोजी जितक्या नागरिकांना पहिला डोस दिला आहे त्यांना दुसरा डोस 84 दिवसांनी म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट 2021 पासून दुसरा डोस देण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता किमान दि.20 जून 2021 पर्यंत कोणालाही पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण होत नसल्याने उद्यापासून 20 जून 2021 पर्यंतच्या कालावधीत आलेल्या लसीच्या साठ्यापैकी 50 टक्के 45 व पुढील वयोगटांतील राहिलेल्या नागरिकांना व 50 टक्के 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस देणे संयुक्तिक होईल.

तसेच यापुढे प्रत्येक दिवशी मागील 84 दिवसांपूर्वी किती जणांना डोस दिले आहेत त्यांना 2 डोस देण्यासाठी तरी किमान तितके डोस उपलब्ध करून दिलेच पाहिजेत. व त्या व्यतिरिक्त उर्वरित नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सुलभरीत्या सुरू राहणेसाठी जादाचे डोस उपलब्ध करून दिले पाहिजेत यासाठी मागील 84 दिवसांपासूनची रोजची संख्या लक्षात घेऊन कार्यक्रम आखावा लागेल. यात दुसऱ्या डोससाठी कोणत्याही परिस्थितीत त्या त्या दिवशी लागणारे डोस उपलब्ध करावेच लागतील त्यात कोणत्याही कारणाने खंड पडून चालणार नाही याची खबरदारी शासनाच्या आरोग्य विभागाला घ्यावी लागेल.

ताउत्के” चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यात नुकसान झाले आहे, यामध्ये वीज पुरवठा दोन- तीन दिवस बंद होता अश्या वेळी ही लस सुरक्षित होती का? लस ठेवण्यास जे थंड तापमान लागते ते लसीला मिळाले का याकडे आरोग्य विभागाचे लक्ष होते का? नाहीतर शासनाने लसीकरण करा सांगितले आहे, त्यामुळे कोणतीच काळजी न घेता फक्त हा कार्यक्रम होत असेल तर त्याचा फायदा होणार नाही असे उदय पाटील यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.