३१८ विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ करण्याचा अशोक ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोना महामारीने जनतेचे जीणे हराम केले आहे. त्यात सर्व बंद असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. उरण तालुक्यातील आवरे गावातील जे. जे. ठाकूर या शिक्षण संस्थेसाज संस्थापक अध्यक्ष अशोक जनार्दन ठाकूर यांनी ज्युनियर पासून १० वी पर्यंतच्या सर्व म्हणजे एकूण ३१८ विद्यार्थ्यांचे २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांची पूर्ण फी माफ करून एक आदर्श उभा केला आहे. याचे अनुकरण इतर शालेय संस्थेने करण्यास काहीच हरकत नाही अशी चर्चा पालक वर्गात सुरू आहे. अशोक ठाकूर यांच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आवरे गाव ही विशेष नर रत्नाची खाण आहे. दातृत्व हे असे असावे की या हाताची खबर त्या हाताला नसावी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आवरे गावातील रयत शिक्षण संस्थेत शहापूर येथे कार्यरत असणारे शिक्षक आणि जे. जे. ठाकूर इंग्लिश माध्यम आवरे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जनार्दन ठाकूर सर यांनी कोरोना कालावधी व विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता पालकांना दिलासा म्हणून या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार म्हणून ज्युनियर पासून ते १० वी पर्यंतच्या एकूण ३१८ विद्यार्थ्यांची सन शैक्षणिक वर्ष जुन 2020–2021 मे पर्यंत या शैक्षणिक वर्षाची संपूर्ण वार्षिक फी माफ करण्याचा निर्णय घेतला.
जे. जे. ठाकूर शिक्षण संस्थेने ज्युनियर ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वर्षभराची फी पूर्णपणे माफ करून एक आदर्श घडविला आहे. याचे अनुकरण इतर शिक्षण संस्थानीं करून विद्यार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी पालक वर्गाकडून जोर धरू लागली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही याची नोंद घेऊन इतर शिक्षण संस्थाना फी माफ करण्यासाठी बंधनकारक करण्यास हरकत नसल्याचे पालक वर्गात बोलले जात आहे.
अशोक ठाकूर सर हे आवरे गावातील निस्सीम शिवभक्त आहेत. त्यांच्या आवरे गावातील भोळेनाथावर अपार श्रद्धा आहे. भोळेनाथ मंदिराचे सद्यस्थितीत कार्य चालू असताना त्यांनी ४२ हजार रुपयांची कौल स्वखर्चाने दिली आहेत. त्यांच्या या दुहेरी कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.












वर्तमानपत्रात बातमी खूप सुंदर रीतीने मांडले जाते