इंडिया बुल्स बलात्कार प्रकरणाला जबाबदार कोण ?
महानगरपालिका प्रशासन की पोलिस ?
आज पर्यंत इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटर मधील अनेक समस्या, तेथील गैरसोय याच्या बातम्या येत असतं. पण गुरूवारच्या त्या काळ्या राञी जे घडलं ते अघटित आणि तितकेच संतापजनक होते.
पनवेल महानगर पालिकेच्या इतिहासात काळ्या अक्षराने लिहिली जावी अशी घटना गुरूवारी घडली. ती ही पनवेल परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था असलेल्या पनवेल जवळील कोन येथील इंडिया बुल्स या इमारतीतील क्वारंटाइन सेंटर मध्ये.
या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका विकृत युवकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी सदर आरोपीविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सध्या तो पोलिसांच्या नजरकैदेत आहे. हा बलात्कारी आरोपी युवक पनवेल मधील भगतवाडी सुकापूर परिसरात राहणारा आहे.
या बलात्कार प्रकरणामुळे महानगरपालिकेची अब्रू वेशीला टांगली गेलीचं आहे. परंतु असा प्रकार घडलाचं कसा याचे देखील विवेचन होणे गरजेच आहे. म्हणूनचं या ठिकाणी काही प्रश्न आम्ही उपस्थित करीत आहोत. कृपया जमलेचं तर उत्तरे द्या ! नाही तर नेहमी प्रमाणे मुग गिळून गप्प बसा !
या बलात्कार प्रकरणामुळे उपस्थित झालेले प्रश्न
1) या क्वारंटाइन सेंटर मध्ये ड्युटीवर असलेले महानगरपालीकेचे अधिकारी वेळोवेळी येथील दाखल क्वारंटाइन लोकांशी संवाद साधतात का ? त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात का ?
2) इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटर ला पोलीस संरक्षण होते का ? या ठिकाणी पोलिस तैनात होते का ?
3) जर पोलिस संरक्षण होते तर पोलिस कर्मचारी गस्त घालायचे का ?
4) जर तेथे पोलिस संरक्षण नव्हते तर का नव्हते आणि याची जबाबदारी कोणाची ? हा विभाग ज्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची की महानगरपालिका आयुक्तांची ?
5) पिडीत महिलेचे नाव जाहीर करायचे नाही हा कायदा आहे आणि तो योग्यचं आहे पण बलात्कार्याचे नाव का जाहीर केले जात नाही ?
Be First to Comment