Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवी अरुण म्हात्रे

श्वास हा तुझाच सैनिका

भारत हेच घर मानलेस रे --

सलाम वीरा तुला नमन हे !

जशी चिंता स्व-कुटुंबाची --

तशीच चिंता तुला देशाची !

सणवार-उत्सवांचा नसे मोह --

देशाप्रती कर्तव्य हेच ठावं !

ऊन-वारा-पाऊस-पाण्याची --

नसे भीती डोंगर - दऱ्यांची !

वसा घेतलास रे देशसेवेचा --

उद्देश जपतोस ध्येयपूर्ती चा !

तुझ्यामुळेच रे आम्ही स्वतंत्र --

हिंडतो-फिरतो मोकळे सर्वत्र !

ईश्वराची निभावशी तू भूमिका --

हे हृदय-स्पंदन तुझेच सैनिका !

वाढो तुझे बळ अनं यशोकीर्ती --

तू अभिमान तूच आमची स्फूर्ती !!

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.