शब्द म्हणती स्वरलतेला सूर दे मजला झणि
गीत काव्यातून झरू दे थांबता ही लेखणी
हात हाती गुंफुनी मग चालती काव्यातुनी
साज लेऊन उतरती जणू तारका नीलांगणी
जन्मले हे गीत बघ अपुल्या नव्या नात्यातूनी
शब्द स्वर झंकारता रुजते मनाच्या अंगणी
सौ. अश्विनी अनिरुद्ध भिडे, पनवेल







Be First to Comment