नको मजसी सहानुभूती*
इतरांहून माझी का वाट वेगळी
निरुत्तरीत मी,हे का माझ्या भाळी
नजरेमधली ती सहानुभूती
जणू मज सहस्त्र इगळ्या डसती
स्वावलंबी मी जपतो स्वप्ने उराशी
सहज घालीन मी गवसणी नभासी
साथ देऊनी राहा पाठीशी
नको मज पोकळ सहानभूती
हवा मजला एक सच्चा साथी
सोबत चालू गुंफून हात हाती
वचनबद्ध मी बांधून गाठी
दयेवीन सक्षम जगण्या साठी
अपंगास या जिद्द अनोखी
नको होऊस तू माझी काठी
विनया वाळिंबे, कामोठे







Be First to Comment