🔷🔷 जीवन... हिंदोळा 🔶🔶
जीवनाच्या हिंदोळ्यावर
झोके घ्यायचे मस्त छान
नको व्यर्थ अभिमान
बाळगावा स्वाभिमान....
हिंदोळा हा या जीवनाचा
तो सर्वांना झुलवत असतो
पुढे जातो अनं मागे येतो
भिववतो तसा आनंदही देतो...
झोका पुढे-मागे होत राहील
तसा आनंद मिळत जाईल
झोक्याची उंची प्रमाणातच बरी
नाहीतर पोटात गोळा येईल..!!
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई मो.- 9987992519.








Be First to Comment