Press "Enter" to skip to content

अधिक मास

अधिक मास

अधिकमास, पुरुषोत्तम मास
थोडा अधिकच वाटतो आहे
गुलाबी थंडीची तयारी करताना
परतीचा पाऊस झोडपत आहे

लहान मुलांचे बालपण संपत आहे
शाळेतल्या मैत्रीचे धागे तुटत आहेत
शिक्षकांशी जोडलेली नाळ तुटत आहे
लॅपटॉप,मोबाईल, गुरु बनू पहात आहेत

चार महिने घरात बसलो आहे
वर्क फ्रॉम होम करीत आहे
निसर्गात जाऊन रमण्याची
आस मात्र धूसर होत आहे

घरबसल्या सगळं मिळतं आहे
पैशाचा सारा खेळ आहे
हाताची काम जात आहेत
रोबोट चे युग येत आहे

योद्ध्यांचे बळी जात आहेत
बळीचा श्वास गुदमरतो आहे
नाकर्तेपणाने तळ गाठला आहे
उदो उदो ने कळस गाठला आहे

पुरुषोत्तमा अधिक मास तुझा आहे
लेकरांना सांभाळणे तुझेच काम आहे
मानवाचे कल्याण तुझ्याच हाती आहे
कोरोनाचा वध करणे अटळ झाले आहे

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.