Press "Enter" to skip to content

बागुलबुवा..

बागुलबुवा..

बागुलबुवा परिस्थितीचा ,फार बाळगू नये
कौतुकाने त्याला फार गोंजारु नये

बागुलबुवा हा घाबरवतच असतो
मग सोपा असणारा मार्गही कठीण वाटू लागतो

मनातला भितीच्या बागुलबुवाला दूर करावं
बिनधास्त जाऊन मग परिस्थितीला भिडावं

न झेपणारे दुःख तो कधी देत नाही
न सुटणारी कोडी तो कधीच टाकत नाही

सोपं काहीच नसतं पण अशक्यही नसतं
न जमण्याइतकं ते कठीणही नसतं

अवघड परिस्थितीला फार कवटाळायचं नाही
हार मानून तिला कधी शरण जायचं नाही

त्यापेक्षा आपणच काळावर स्वार व्हावं
स्वैर त्याच्या धावण्यावर लगाम घालावं

कसं जगायचं हे आपणंच ठरवायचं
रडण्यापेक्षा नेहमीच लढत राहायचं

सकारात्मक दृष्टी ठेवली की सारं स्वच्छ दिसतं
झाकोळलेलं आभाळही कसं निरभ्र होतं

भितीच्या या बागुलबुवाला दूर भिरकावायचं
निर्भिड मनाने स्वच्छंदी आयुष्य जगायचं…

सुजाता कुलकर्णी, आदई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.