Press "Enter" to skip to content

ढालगज करोना

ढालगज करोना

चंबू गबाळ घेऊन तुम्ही
इकडून तिकडे फिरलात
मागच्या सीटवर बसऊन चक्क
करोना घेऊन आलात

धुवा पुसा फवारा वाफारा
जपा सारखा जपला
चोर पावलाने करोना कसा
तुमच्याच घरात शिरला

सतरा वेळा साबणाने
हात धो धो धुतलात
करोना पेशंट पासून राव
दहा कोस राहिलात

तरीबी प्रेमाने तो तुमच्याच
गळ्यात पडला
तुमच्यासह कुटुंबात तो
सलगी करून राहिला

चौदा दिवस पाहूनचार
पूरेपूर भोगला
वास्तल्याच्या धाग्याने
नाती गुंफुन गेला

पोलिसांच्या दंडुक्याने तर
लईच भाव खाल्ला
हेकट चिकट ह्या ढालगजा
पुढे दडी मारुन बसला

बेफिकीरीपायी जगाच्या
करोना फुलला
भारत या चिन्याला
पुरून उरला

सौ.नम्रता धनावडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.