Press "Enter" to skip to content

तुझ्या मुक्तछंदात

तुझ्या मुक्तछंदात

तुझ्या मुक्तछंदात, दिसे रानवारा ।
तुझ्या मुक्तछंदात, म्रुगाच्याच धारा ॥

तुझ्या मुक्तछंदात, मनाची कवाडे ।
तुझ्या मुक्तछंदात, मनाचे निवाडे ॥

तुझ्या मुक्तछंदात, असे एक नेम ।
तुझ्या मुक्तछंदात, दिसे मुग्ध प्रेम ॥

तुझा मुक्तछंद, घनांनीच दाटे ।
कधी तो कुणाला, अनाहूत वाटे ॥

तुझ्या मुक्तछंदात, निळीशार लाट ।
तुझ्या मुक्तछंदात, रमते पहाट ॥

तुझ्या मुक्तछंदात, तुझा मुक्तछंद ।
तुझ्या मुक्तछंदात, जुळे एक बंध ॥

केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.