काही सुचत का नाही
काही सुचत का नाही
तू बोलत का नाही
काय झाले रे असे
मन असे स्तब्ध का जाहले
ना कोणतीच हालचाल आहे
ना कुठेही जाग आहे
अन रोज छळणारा वाराही
आज लांब कुठेतरी गेला आहे
कोकिळेच्या कुहू कुहूतही
आज मन लागत नाही
जीवाची तगमग काही
केल्या शांतवत नाही
दूरवर आकाशात या
एक काळा नभ आलेला
त्याला पाहून उरात माझ्या
उगाच हुरहूर का आहे
का ही निरव शांतताही
इतकी भीषण वाटत आहे
तू नसता सभोवती
मनी व्याकुळता दाटत आहे.
काही सुचत का नाही..
तू बोलत का नाही……
प्राची देशपांडे, खांदा कॉलनी






Be First to Comment