Press "Enter" to skip to content

माणूस

माणूस

शब्द ऐकता तुझा नदी सागराचे मिलन भासे
वाट पाहणारा तुझी तो इथलाच माणूस होता

दिसामागुन दिवस गेले आठव ती मजवर हासे
विरहात तुझ्या झुरणारा इथलाच माणूस होता

अशक्य वाटणारी वेळ मुखावर जणू मारी ठोसे
अश्रुंवरही बांध घाली तो इथलाच माणूस होता

किती आणि कुठे पाहू सांग आता तूच कसे
मिटल्या डोळ्यात पाही तो इथलाच माणूस होता

  • स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.