Press "Enter" to skip to content

“गोष्ट धमाल गावची” आगरी भाषेत दोन अंकी विनोदी नाटक विनामूल्य


मुंबई प्रतिनिधी:( सतिश पाटील )

उरण तालुक्यातील पिरकोन गावातील, नाट्य संस्कृती जतन करणारे श्री शिवशंकर नाट्य मंडळ पिरकोन यांच्यावतीने गेले कित्येक वर्ष गावात विविध नाट्य प्रयोग सादर करून नाट्य परंपरेचा वारसा जपला जात आहे.

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रसिद्ध लेखक श्री.किशोर पाटील लिखित, दिग्दर्शित पोट धरून हसता हसता सामाजिक समस्यांवर विचार करायला लावणारे अस्सल आगरी भाषेतील दोन अंकी विनोदी नाटक “गोष्ट धमाल गावाची” गुरुवार 30 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाच्या भव्य प्रांगणात श्री शिवशंकर नाट्य मंडळाकडून सादर होणार आहे. लेखक किशोर पाटील यांचे अतिशय गाजलेले” हाल्या मारतंय हेलपाटा “या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्य मंडळाकडून तीन पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे हे नवीन नाटक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

या धम्माल विनोदी नाटकाचा हा शुभारंभाचा प्रयोग विनामूल्य असून समस्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे मंडळाने आवाहन केले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.