
मुंबई : प्रतिनिधी
शिवदास कांबले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्रा वहिनी अजित पवार यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये भेट घेतली.
या भेटीदरम्यान पनवेलच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर तसेच पनवेलच्या सामाजिक व विकासात्मक विषयावरती चर्चा करुन पाणी विषयावर खासदार सुनील तटकरे साहेब यांनी जलसंपदा मंत्री असताना दिलेल्या योगदानाची माहिती अवगत केली. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेला विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा घटक म्हणून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मजबुतीने उभे असल्याची माहिती देवुन पनवेलच्या राजकीय परिस्थिती ची चर्चा केली. विविध सामाजिक व विकासात्मक मुद्यावर सकारात्मक माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी यांच्या बरोबर केली


Be First to Comment