Press "Enter" to skip to content

पहेलगाम सावरतंय अन बहरतंय..

सैन्याचा कडक बंदोबस्त : २२ एप्रिल च्या भ्याड हल्ल्यातून सावरत काश्मीर घेतोय गगन भरारी

श्रीनगर : दीपक घोसाळकर

भारतातील पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून गणल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम मध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करून 27 कुटुंबीयांवर क्रुरतेने परिसिमा करून कायमचे संपवले. धर्म विचारून गोळ्या झाडल्या. जगभरात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. संपूर्ण देश या अमानवी कृतीचा कळस गाठणाऱ्या घटनेने हादरून गेला. परंतु शासनाने वेळीच सर्व उपाययोजना करून पहेलगाम व आजूबाजूच्या पर्यटन खोऱ्यात सुरक्षेचे जाळे विणून या भागात पर्यटन पुन्हा मूळ पदावर कसे येईल यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहेत.

या भागाला भेट देण्यासाठी पनवेल तालुक्यातील पनवेल पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास दौरा आयोजित करून पहेलगांमधील स्थानिक पत्रकार बांधव, हॉटेल व्यवसायिक,अन्य व्यवसायिक, घोडसवारी करणारे,तसेच छोटे मोठे व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करणाऱ्याशि थेट संवाद साधून येथील सद्यस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, निलेश सोनावणे, सचिव हरेश साठे, प्रवीण मोहोकर, दीपक घोसाळकर, दत्तात्रेय कुलकर्णी, लालचंद यादव, राजू गाडे आदी पदाधिकारी, सदस्यांचा सहभाग आहे.

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील पहिला मध्ये आता सुरक्षा योजनेची विशेष अंमलबजावणी करून व येथील येणाऱ्या पर्यटकांच्या जीविताचे रक्षण करण्याची हमी घेतली असल्याने येथे आता पर्यटक थोड्याफार प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे येथील पहेलगाम व त्याचा आजूबाजूचा परिसर पुन्हा आपल्या भरताना दिसून येत आहे.
गतवर्षी झालेल्या पहिला नंतरच्या निर्माण झालेल्या सामाजिक जीवनावरती सद्यस्थितीचा परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचांने एक अभ्यास दौरा आयोजित केला होता.या मध्ये पनवेल मधील 11 पत्रकार सदस्य सहभागी झाले होते. पहेलगाम खोऱ्यामधील विविध ठिकाणी पत्रकार विकास मंचच्या सदस्यांनी पर्यटन स्थळी भेटी देऊन येथील स्थानिकांशी चर्चा केल्या. या खोऱ्यातील आरु व्हॅली व बेताब व्हॅली पुन्हा पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. भारतीय जवानांच्या सुरक्षे च्या उपाय योजनेमुळे पर्यटक आनंद लुटत असताना दिसून येत आहे. येथील आता जनजीवन मूळ पदावर येत आहे थोडा वेळ जाईल परंतु केंद्र शासनाच्या विविध उपाय योजना येथे निश्चितच फलदायी होत असल्याच्या दिसून येत आहेत.

नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण अन संपन्न असलेलं काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम या पर्यटन स्थळाला निसर्गाने भरभरून दान दिलेल आहे. एका बाजूला खळखळत्या स्वच्छ थंडगार पाण्याच्या कायम वाहणारी नदी उंच उंच हिरवेगार शालिनी नटलेले डोंगर एकीकडे बर्फाच्या चादरीने लपेटलेले डोंगराचे कडे हे नवे निसर्ग सौंदर्य ही खरोखरच एक दिन अनोखी देणगी लाभलेलं पहेलगाम पर्यटन स्थळ आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी आजही पहेलगामच्या स्थानिकांमध्ये दिसून येत आहेत. एक वर्ष उलटलं तरी दहशतीच्या आठवणी मात्र ताज्या अन जिवंत आहेत स्थानिकांवर झालेल्या दहश हल्ल्याच्या जखमा आजही भरभरून वाहत आहेत. तब्बल अडीच हजार घोडसवारी, 2000 पेक्षा जास्त टुरिस्ट गाड्या चालवणाऱ्यांचं जीवन या पर्यटनावर अवलंबून आहे. ते पूर्व पदावर यायला अजून बराच काळ लागणार आहे.

आत्मघाती हल्ल्यानंतर पहिलाच जनजीवन पूर्णपणे बदलून गेल आहे.दहशतवाद्यांच्या भीतीवर मात करून पुन्हा पहेलगाम पूर्वीसारखं गजबजून सुवर्णयोग निर्माण होईल का. पर्यटनावरच अवलंबून असलेलं पहेलगाम हल्ल्यानंतर आर्थिक दिवंचनेत अडकून गेला आहे.पर्यटकच फारसे येत नसल्यामुळे एक वर्षभरामध्ये हॉटेल व्यवसायावरही त्याचा आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम झाल्याचे सुद्धा हॉटेल व्यवसायिक सांगत आहेत.शाल, अक्रोड, बदाम अन्य सुकामेवा विकणाऱ्या बाजारपेठेवरील विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. पर्यटकांचा राबता कमी झाल्यामुळे टुरिस्ट गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांवरही वर्षभरात उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या ठिकाणी फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना आता जीवन जगण्यासाठी अन्य ठिकाणी जाऊन रोजगार मिळवावा लागत आहे. पर्यटकच कमी प्रमाणात येऊ लागल्याने येथील स्थानिकांना मात्र जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे.

मात्र आता केंद्र सरकारच्या विशेष विविध पर्यटकांशी निगडित उपाययोजना या ठिकाणी आता केल्या जात आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात केल्याचे दिसून येत आहे. जागोजाग बंदूकधारी जवान भारतीय सैन्य दल डोळ्यात तेल टाकून पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसून येत आले आहे. आता जनजीवन हे मूळ पूर्वपदावर आले असून पर्यटकांनी कोणतीही मनात भीती बाळगू नये.केंद्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत आहे. भारतातील आपल्या पृथ्वीवरील स्वर्गाला निश्चितच पर्यटकांनी भेट देऊन येथील पर्यटन व्यवसायाला निश्चित चालना देण्याच्या आवाहन येथील स्थानिक करीत आहेत. पहेलगाम मधील येणाऱ्या पर्यटकांना येथील स्थानिक आपला देव मानत आहेत.आम्हाला व्यवसाय द्या, आमच्याकडून वस्तू खरेदी करा अशी याचना करता ते दिसत आहेत. अगर आप नही आओगे तो हम कैसे जियेंगे अशी आर्त साद ते देताना दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.