Press "Enter" to skip to content

पती-पत्नीला एकाच दिवशी मिळाली पोलीस खात्यात भरती होण्याची सुवर्णसंधी


खांब,दि.२९(नंदकुमार मरवडे)

पती-पत्नीला एकाच दिवशी पोलीस खात्यात भरती होण्याची सुवर्णसंधी मिळाल्याचा दुर्मिळ योगायोग घडून आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहा तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथील रहिवासी असणारे मधुकर मोरेश्वर मरवडे रेयांचे सुपुत्र सौरभ मरवडे व सुनबाई प्रतिक्षा सौरभ मरवडे (प्रचिती राजेंद्र शिगवण) यांना ही पोलीस खात्यातील भरतीची सुवर्णसंधी मिळाली असून त्यांची मेहनत फळास आली असल्याचे बोलले जात आहे.गत वर्षीच सौरभ आणि प्रचिती विवाहबद्ध झाले.विवाहबद्ध झाल्यापासून पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचा त्यांनी ठाम निर्धार करून व त्या दृष्टीने त्यांनी सातत्याने प्रयत्न केले व त्यांचे प्रयत्न व मेहनत अखेर फळास आली असून एकाच दिवशी सिंधुदुर्ग येथे पोलीस दलात भरती होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

सौरभ आणि प्रचिती यांना मिळालेल्या सुयशाबद्दल ग्रामस्थ व महिला मंडळ तळवली तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ तळवली व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.