सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा ###
🐡 पुन्हा लॉकडाऊन 🐡
पुन्हा चालू होत आहे
कडक लॉकडाऊन
कोरोनाला हरवू या
घरातच कैद राहून
स्वतःवर बंधन टाकून
कडक नियम पाळू या
छोट्या छोट्या कामाला
घराबाहेर जाणे टाळू या
कमीत कमी लोकांशी
केला जर तुम्ही संपर्क
तरच वाढणार नाही
कोरोना रोगाचा संसर्ग
बाहेर पडताना तोंडावर
नेहमी लावत जावे मास्क
विषाणू तोंडात जाण्याचे
राहणार नाही कोणते रिस्क
ऐकत जावं जरा लोकांचे
करू नका आपली मनमानी
अशा वागण्याने तुझ्यासंगे
होई दुसऱ्याचा जीवाची हानी
कोरोना संपवायचे आहे तर
उरलाय फक्त एकच मार्ग
नियमांचे कडक पालन करू
कोरोनाला दाखवू त्याचा वर्ग
– नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769






Be First to Comment