

गुरुसमान मानणाऱ्या सहकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांना दिल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
उलवे, ता. २८ : गुरुपौणिमा म्हणजे व्यासांचा जन्मदिन. त्यांनी ४ वेद आणि १८ पुराणे लिहिली. त्यामुळे त्यांना गुरुंचे गुरू म्हणून संबोधले जाते. आपल्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यांना आपण गुरुसमान मानतो. त्यात आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गुरू म्हणून मोलाचा वाटा असतो.
यंदा गुरुपौणिमा बुधवारी (ता. २९) आहे. त्यामुळे गुरु-शिष्य परंपरा जपण्यासाठी गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना गुरुसमान मानणाऱ्यांची संख्या खूप आहे. गुरुपौर्णिमेला महेंद्रशेठ घरत भारतात नाहीत. कारण गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच महेंद्रशेठ घरत यांनी सहपरिवार लंडनला प्रयाण केले. त्यामुळे एम. जी. ग्रुपचे सहकारी आणि महेंद्रशेठ घरत यांना गुरुसमान मानणाऱ्यांनी शेलघर येथील त्यांच्या ‘सुखकर्ता’ बंगल्यावर जाऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या आणि सहपरिवार परदेश प्रवासाच्या शुभेच्या दिल्या. महेंद्रशेठ घरत यांनी आपली नात समायरा हिच्यासोबत आपल्या शिष्यांच्या आणि आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि लंडनला प्रयाण केले.




Be First to Comment