

पेण, ता. २७ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नुकत्याच विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पेण तालुक्याच्या वतीने शाळेय विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.
पेण तालुका प्रमुख समीर सुभाष म्हात्रे यांच्या सौजन्याने आणि जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या प्रमुख उपस्थिती शहरातील कन्याविद्यालय, प्रायव्हेट हायस्कूल आणि सार्वजनिक विद्यामंदिर येथे सुमारे ४ हजार २०० विद्यार्थ्यांना पेन वाटप कार्यक्रम करण्यात आला.यावेळी बोलतांना प्रसाद भोईर यांनी सांगितले की या अगोदर राज्याच्या हितासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतले मात्र आज देशातील विद्यार्थ्यांवर जी आंदोलनाची वेळ आली योग्य नसून याला ख-या अर्थाने आपण युवा पिढीने लढा दिला त्याला सॅल्युट करून आपण विद्यार्थी देशाचे भवितव्य आहोत त्यामुळे आपल्या हातातील लेखणी अशीच जिवंत ठेवा या शुभेच्छा त्यांनी सार्वजनिक विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, शहर प्रमुख सुहास पाटील, नगरसेविका अरुणा पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक बाळू पाटील, लवेन्द्र मोकल, चेतन मोकल, राजेंद्र पाटील, युवासेना जिल्हा अधिकारी नीलेश म्हात्रे, तालुका अधिकारी योगेश पाटील, शहर अधिकारी महेश नागे, नंदकिशोर मोकल, नरेश सोनवणे, साईराज कदम आणि शिवसैनिक उपस्थित होते.


Be First to Comment