Press "Enter" to skip to content

वडखळ ग्रामपंचायत विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन

वडखळ नाका हा येणाऱ्या काळात मुख्य बाजारपेठ असणार- आमदार रवींद्र पाटील

पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वडखळच्या विकासाला जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून अधिकची गती देत असताना येथील होणारी विकासकामे पाहता वडखळ नाका हा येणाऱ्या काळात मुख्य बाजारपेठ होणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवींद्र पाटील यांनी येथे केले.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत वडखळ ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन, बुद्ध विहार इमारत उद्घाटन, वडखळ बस स्टॅण्ड ते बोरी फाटा मुख्य रस्त्याचे तसेच आठवडा बाजार रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन यासह इतरही कामांचे उद्घाटन भूमिपूजन यावेळी आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार रविंद्र पाटील, जिप.सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, सदस्य प्रभाकर म्हात्रे, जेएसडब्ल्यु सीएसआर प्रमुख सुधिर तेलंगे, धरमतर फोर्टचे अधिकारी समिर गायकवाड, वडखळ ग्रामपंचायत सरपंच शिवानी म्हात्रे, उपसरपंच योगिता मोकल, सदस्य योगेश पाटील, पंस.सदस्य प्रदिप म्हात्रे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, प्रभाकर म्हात्रे, माजी सरपंच राजेश मोकल, निलेश पाटील आदिंसह सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अधिक बोलताना आमदार रवींद्र पाटील म्हणाले की वडखळ विभागाला ऐतिहासिक रूप आहे त्यामुळे येथे विकास कामे होत असताना सर्व नागरिकांनी एकसंघी येणे काळाची गरज आहे जेएसडब्ल्यूने एवढा मोठ्या प्रमाणात दिलेला निधी त्याचा योग्य उपयोग करावा आणि नवीन इमारतीच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी असे त्यांनी यावेळी सांगितले.तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागाकरीता येथे नवीन आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येत असल्याने जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे असे जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काहींचा सन्मान करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.