
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत चर्चेसह विविध विषयांना मंजूरी ; लतिफ शेख यांनी घेतला अंदाजपत्रक बनविणाऱ्यांवर आक्षेप
पनवेल : प्रतिनिधी
दिनांक 22 जुलै रोजीची स्थगित करण्यात आलेली पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा क्र. ६, सोमवार, दि. २७ जुलै रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आली. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा घेण्यात आली. या महासभेत विविध विषयांवर चर्चा करून विषय मंजूर करण्यात आले.
यावेळी मंचावर उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम उपस्थित होते. तसेच सर्व महापालिका सदस्य व महापालिका अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती – ड, प्रभाग क्र.१९ मधील अं.भु.क्र.५०६ कोळीवाडा मार्केड यार्ड परिसरातील स्मशानभूमी विकसीत करणे. या कामाच्या अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेची प्रशासकीय व आर्थिक मान्यता मिळणेबाबत या विषयास महासभेने मंजूरी दिली.
देहरंग धराणातून पनवेल शहराकरीता वाढीव पाणी पुरवठा योजना करणेकामी प्रस्ताव जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र नागरी पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर योजनेअंतर्गत (MEWREP) प्रशासकीय मान्यतेकरीता शासनास सादर करणेबाबतच्या विषयास महासभेत चर्चा करून मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्यमान एलईडी पथदिवे देखभाल, दुरुस्ती तसेच नवीन एलईडी लाईट्स आणि CCMS चा पुरवठा, स्थापना आणि देखभाल दुरुस्ती (१० वर्षे) साठी राज्यस्तरावर नेमलेल्या निविदाधारक राज्यस्तरावर M/s BAC Infratech Pvt.Ltd and M/s Vinic Global PVt.Ltd (JV) या संस्थेबरोबर करारनामा करणेकरिता मा. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणेबाबतचा विषय महासभेत नामंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कळंबोली व नवीन पनवेल येथील विविध ठिकाणच्या उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह पथदिप खांब उभारुन कार्यान्वित करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील सेक्टर १२, भुखंड क्र.५८B येथे उद्यान विकसित करण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर २०, भुखंड क्र.१९ येथे उद्यान विकसित करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर ०६ E, भुखंड क्र. ०९ B येथे उद्यान विकसित करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील सेक्टर १२, अं.भु.क्र.१२ अ येथील मच्छी मार्केट (दैनिक बाजार) इमारतीचा परिसर विकसीत करणे, संरक्षण भिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. १८ पनवेल येथे स्वप्नरेखा सोसायटी ते ठाणा नाका जंक्शन येथे जुने पावसाळी गटार तोडुन नविन गटार बांधण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र १४ मधील एच ओ सी कॉलनी लगत असलेल्या कातकरवाडी ते जिंदाल उपटाउन एव्हेन्यु इमारती पर्यंत आर.सी.सी पावसाळी गटाराचे बांधकाम करण्याचा विषय महासभेने मंजूर केला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ व इतर मध्ये रस्त्यालगत असणाऱ्या गटर, पादचारी मार्गामधील इन्स्पेक्शन चेंबर्सवर वेळोवेळी आवश्यकते नुसार सन २०२६-२७ व सन २०२७-२८ या दोन वर्षाकरीता झाकणे लावणे व किरकोळ दुरुस्ती करण्याचा विषयांवर सर्व सदस्यांच्या उपसूचनासह मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशानभूमी मध्ये पाण्याची व्यवस्था करण्याचा विषय उपसूचनासह मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नवीन पाण्याचे पंप दोन वर्षाकरिता पुरवणे आणि बसविण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
शिलार धरण प्रकल्पातंर्गत धरणाच्या भागभांडवली खर्चातील हिस्साची रक्कम जलसंपदा विभागास कामाच्या प्रगतीनुसार उपलब्ध करुन करणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
मेट्रो मार्ग-१२ (कल्याण-तळोजा (अमनदुत)) मार्गाचे अंमलबजावणीकरिता मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणास पनवेल महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळणेकामी विनंती हा विषय महासभेत नामंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये अनावश्यक, धोकादायक वाढलेल्या वृक्षांच्या छाटणी केलेल्या फांद्या व पडलेले वृक्ष यांची विल्हेवाट लावणेकामी ट्रॅक्टर ट्रॉलीसह वूड चीपर मशीन प्रभाग निहायनुसार खरेदी करण हा विषय महासभेत योग्य उपसूचनांसह मंजूर करण्यात आला.
श्री. नितिन देवराम साके यांचा माहिती व जनसंपर्क अधिकारी, गट व पदाचा राजीनामा स्विकृत करणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
“प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना” या खाण बाधित क्षेत्रातील गरीब व गरजू महिल’ स्वयंरोजगारासाठी संधी मिळणेकरिता घरघंटी , शिवणयंत्र, मिरची कांडप डीबीटी तत्वावर पुरविणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी “विरंगुळा केंद्र” स्थापन करुन धोरण ठरविणेबाबतच्या विषय महासभेत चर्चा करून मंजूर करण्यात आला.
समाज विकास मार्फत पनवेल महानगरपालिका हद्दीतील युवक-युवतींना MSCIT मोफत प्रशिक्षण देणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील फरशीपाडा, आडिवली, रोहिंजण व पेंधर येथील शाळांकरीता तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर जागा उपलब्ध करुन घेणेबाबतचा विषय महासभेने मंजूर केला.
गणेशोत्सव व नवरात्रौत्सव २०२६ निमित्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विसर्जन घाट येथे सुविधा पुरविणे, दुरुस्ती करणे व कृत्रिम तलाव बांधणेबाबतचा विषय मंजूर करण्यात आला.
“माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत प्राप्त प्रथम क्रमांकाच्या बक्षीस रक्कमेंतर्गत प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) मा.सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमी (अ.भू.क्र.१०६) येथील नादुरुस्त गॅस दाहिनी बदलून नवीन गॅस दाहिनी बसवणे. (दोन युनिट) या कामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणेबाबतचा विषय महासभेत स्थगित ठेवण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील अं.भु.क्र.१८४/१ ए पार्ट बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारणे प्रस्तावास व खर्चास मान्यता मिळणेबाबतचा विषय महासभेत स्थगित करण्यात आला.
नगरसेवक लतीफ शेख यांनी उपरोक्त दोन्ही विषयांमध्ये आवश्यक खर्चाच्या तीन पट रक्कम अंदाजपत्रकात नमूद केल्यामुळे तीव्र आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी देखील याच कारणास्तव या दोन्ही प्रस्तावांना आक्षेप घेतला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमी (अ.भू.क्र.१०६) येथील नादुरुस्त गॅस दाहिनी बदलून नवीन गॅस दाहिनी बसवणे. (दोन युनिट) या कामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणेबाबतचा विषय महासभेत स्थगित ठेवण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील अं.भु.क्र.१८४/१ ए पार्ट बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारणे प्रस्तावास व खर्चास मान्यता मिळणेबाबतचा विषय महासभेत स्थगित करण्यात आला.
नगरसेवक लतीफ शेख यांनी उपरोक्त दोन्ही विषयांमध्ये आवश्यक खर्चाच्या तीन पट रक्कम अंदाजपत्रकात नमूद केल्यामुळे तीव्र आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी देखील याच कारणास्तव या दोन्ही प्रस्तावांना आक्षेप घेतला.
भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक भिडले एकमेकांना…
सभा संपल्यानंतर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर एक अनोखे नाट्य पाहायला मिळाले.पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील अं.भु.क्र.१८४/१ ए पार्ट बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारणे प्रस्तावास स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर याच प्रभागातील नगरसेवक सुमित प्रभागातील आणि रुचिता लोंढे यांच्यात “तू तू मैं मैं” झाली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.


Be First to Comment