Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवी अजय शिवकर

होऊ दे सकाळ

रात्रीच्या गर्भात उपजे
उद्याचा उषःकाळ
कठीण काळ हा जाईल वेड्या,होऊ दे सकाळ

बहुते संकटे मार्गे येतील ,
मागील सर्व पुढेही जातील,
अडथळे थोडे राहिले आता
बस्स थोडासा सांभाळ
कठीण काळ हा जाईल वेड्या,होऊ दे सकाळ

घाव बसतो घावावरती
उगाच बनत नसते मूर्ती
विजय नक्की मिळेल आधी
अपयश पचवायला शिकाल
कठीण काळ हा जाईल वेड्या,होऊ दे सकाळ

हजार वेळा पडशील जेव्हा
शिखरावरती जाशील तेव्हा
रात्र असे ही वैऱ्या ची
सहन करहा दुःखाचा काळ
कठीण काळ हा जाईल वेड्या,होऊ दे सकाळ

अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.