सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा 🔷🔶🔷🔶
देवपण
शिक्षक देत असतात शिक्षण
नेहमी राखावा त्यांचा मान
लिहिण्या-वाचण्या शिकवती
शिकताना ठेवावे एकाग्र मन...
फळ्याचा रंग डांबर काळा
म्हणुनी उठतो खडू पांढरा
अ आ इ ई काळ्या पाटीवरी
पाढे म्हणायचे भरा-भरा...
टाकीचे घाव सोसल्या विना
दगडाला देवपण येत नाही
छडी छम-छम लागल्यावर
विद्या कशी घम-घम येई...
शिक्षक शिकवती शाळेत
आई-बाबा-वडीलधारी घरात
परिस्थिती शिकवते समाजात
सदाचारी-ज्योत उजळावी नीत...
ज्ञान दूर करत असते अज्ञान
साक्षरता हे असते मोठे धन
शिक्षण-अनुभव हे असती गुरु
सत्किर्तीने वाढावे मान-स्थान...
©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो. 9987992519.






Be First to Comment