सुखकर्ता गणेश
गणेशा तुझ्या रंगी रंगून जाते
तुझे गीत गाता भान हरपते
मूर्ती पाहता चित्त होई शांत
सोंड वाकडी शोभे एकदंत
दुर्वांकुर भाळी गंध केशरात
पूर्ण चंद्रमा रूप लावण्यात
—–तुझ्या आगमने दिव्य चैतन्य येते
चिंतामणी लंबोदर हे गजानन
वरदविनायक बाप्पा तू दयाघन
दर्शनात हरपते तनमन भान
ओंकार विराजित रूप सनातन
—-नाम घेता मुखी तुझे रूप साकारते
नैवेद्याला मोदक प्रिय तुला फार
आवडतोस सर्वांना तू विघ्नहर
सकल नव्या कार्यी होशी आधार
संन्मती देशी सकला तू जगदाधार
—-मुळारंभ आरंभी जग सारे वंदिते
सुजाता खरे.(नवीन पनवेल).






Be First to Comment