पावसा….
अरे पावसा, तू आलास का?
तर थोडा दम घे ,
एकदम येऊन नको करुस तांडव,
सर्व काही वाहुन नको नेवू
पावसा तु आलास का?
तुझ्या येण्याने वृक्ष-तरूवर सजीव होऊदे,
तुझ्या पाण्याने धरणी चिंब भिजूदे,
ओल्या मातीचा सुवास येऊदे,
सुवासित मातीचा सुगंध घेऊन
मन रोमांचित होऊदे.
पाऊसा तु आलास का रे?
तुझ्या पाण्यात चिंब भिजून,
मी आणि तू एकाकार होतो,
गालावर तुझी धार असते
मनावर तुझा ध्यास असतो
हळूच येऊन थंड वारा देतो,
पाऊसा तु आलास? …
तर स्वागत आहे.
अपराजिता घांगुर्डे, खांदा कॉलनी
Be First to Comment