कोरोना चा कंटाळा
माझ्या आईला आला कंटाळा
कधी जाऊ देईल हा बंदी ताळा
आई घाल तू कंटाळ्याला आळा
जो दिसत नाही त्याचा हा ताळा
आई म्हणाली….
जाऊ दे ना मला देवळाला
सकाळ संध्याकाळी फिरायला
सर्वांशी दे भेटू मला
फोनवर बोलून आला कंटाळा
असा कसा हा कोरोना
पेपर नाही कोडे नाही
कसे जगायचे समजेना
माझ्या आईला आला कंटाळा
टीव्ही पाहिला जपली माळा
पण गेला नाही हा कंटाळा
चल जरा बाहेर भटकायला
माझ्या आईला आला कंटाळा
रामरक्षा म्हणा आणी पत्ते खेळा
नाष्ता जेवण आणी जा झोपायला
भेटते व्हाट्सअप, गुगल मिट ला
माझ्या आईला आला कंटाळा
प्रशांत सहस्रबुद्धे, नवीन पनवेल






Be First to Comment