Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

कवी अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता “हे विश्वची माझे घर”

हे विश्वची माझे घर !

आपल्या मनात डोकावून पाहावे आपणच करावा मनाशी विचार जमेल तसे कुणाच्या कामी यावे मगच म्हणावे- हे विश्वचि माझे घर...१.

मदतीचा हात द्यावा गोरगरिबांना बुडत्याला असे काठीचा आधार न पाहत बसावे नुसते टुकूर-टुकूर मगच म्हणावे- हे विश्वचि माझे घर...२.

कुणी गरीब कुणी श्रीमंत दुनियेत सदा ठेवावे मन कृती पूर्वक उदार जपावा खरा 'माणूस धर्म' वेळोवेळी मगच म्हणावे- हे विश्वची माझे घर...३.

नाही पाळत भेदभाव सूर्य-चंद्र-तारे सर्वत्र बरसती मेघ, वाहती छान वारे कुणासाठी कधी बनुनी पहावे ईश्वर मगच म्हणावे- हे विश्वचि माझे घर...४.

©® कविश्री- अरूण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई. मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.