सल
असेही होते कधी
घटना समोर घडून जाते
असेही कधी होते नंतर
मनातली सल टोचत राहते
एखाद्याशी मनातले
बोलायचे राहून जाते
एखाद्याशी मनसोक्त
भांडायचे राहून जाते
एखाद्यावर मनापासून
प्रेम करायचे राहून जाते
एखाद्याला शिवी देऊन
हासडायचे राहून जाते
एखाद्या उपकाराची
परतफेड राहून जाते
एखाद्या अपकाराची
शिक्षा द्यायची राहून जाते
एखाद्याला वाह म्हणून
दाद द्यायची राहून जाते
एखाद्याला कौतुकाची
थाप द्यायची राहून जाते
चूक करताना दिसूनही
थांबवण्याचे राहून जाते
सल्ल्याचे चार वाक्य
सांगायचे राहून जाते
काय कारण असेल बरं
असेल का आपले वय?
की असेल आवडत्या
व्यक्तीला गमवायचे भय?
माहिती नाही त्याप्रसंगी
मात्र घेता येत नाही निर्णय
मग मात्र डीवचत राहते
नेहमी त्या प्रसंगाची सय
म्हणूनच नेहमी मित्रा
मनमोकळे जगावे
मनामध्ये कुढत न राहता
सत्य पण सुंदर बोलावे
शेखर अंबेकर, आदई






Be First to Comment